Posts

Showing posts from January, 2008

आई.....

पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जीने मला भरवला, हाताचे बोट पकडून जीने मला चालवले, आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले. आठवतय मला, चूकल्यावर धपाटा घातलेला, भूक लागली आहे सांगताच, खाऊचा डब्बा पुढे केलेला. अनेकदा तिने, जेवणासाठि थांबायचे, आणि मी मात्र न सांगताच, बाहेरून खाऊन यायचे. कधी कधी रागाच्या भरात, उलटहि बोललोय, आणि मग चूक समजल्यावर, ढसा ढसा रडलोय. तिने सुद्धा माझे बोलणे, कधीच मनावर नाहि घेतले, मागाहून घालवलेले माझे अश्रू, पदराने पुसून टाकले. माझी स्तुती करताना, ती कधीच थांबत नाहि, अन माझा मोठेपणा सांगतान, तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि. माझा विचार करणे, तिने कधिच सोडले नाहि, माझ्यावर प्रेम करण्याला, कधीच अंत नाही. मी सुद्धा ठरवले आहे, तिला नेहमी खुश ठेवायचे, कितीहि काहि झाले तरी, तिला नाहि दुखवायचे. आईची महानता सांगायला, शब्द कधीच पूरणार नाहि, तिचे उपकार फ़ेडायला, सात जन्म सुद्धा शक्य नाहि

आई

दिवसभर कितीही दंगा केला तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित शांत झोप कधी लागली नाही कुणी विचारतं .. "तुला घरी जावसं वाटत नाही?" कसं सांगू त्यांना, घरातून निघताना आईला मारलेली मिठी सोडवत नाही आई, तू सांगायची गरज नाही तुला माझी आठवण येते आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो तरीहि तू सहा वाजताच उठतेस तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला आता जीभ आसुसली घरापासून दूर ... आई जग खूप वेगळं आहे तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते आता रणरणंत ऊन आहे तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ... एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ... आणि तू त्यांना जाऊ दिलंस आई, तू इथे नाहीस बाकी माझ्याकडे सगळं आहे घरापासून दूर जग खूप वेगळं आहे

बाबा

आई वर कविता सारेच लिहितात बाबानवर का कोणी लिहीत नाही बाबाही आई एवढेच प्रेमळ असतात हे कोणालाच का पटत नाही बाबानाही वाटत मनापासून सार्‍यानी आपल्याशीही खूप बोलाव रात्री उशिरा घरी आलो म्हणून काय झाल पोरानी आपल्याही कुशीत निजाव करतात ते सार फक्त आपल्यासाठी बाबा फक्त ते कधी बोलून दाखवत नाही आई एवढ आपण कधी बाबाना सातावत नाही ते रागावतील म्हणून त्यांच्याशी बोलतच नाही आणि म्हणे पालक मूल यांच्यातला संवाद संपत चाललाय विचारा स्वतला बाबांशी शेवटच कधी बोललाय ( सर्व बाबांसाठी ) **रमेश **

आईलाही मन असतं

आईलाही.... (आई तुझ मन, तुझ्या आशा,तुझं महात्म्य समजुन घेन्यासाठी आम्हि खरच लहान आहोत.) आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही 'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही 'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं,अम्हाला कधी समजलंच नाही तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही 'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी आम्ही सादा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही. आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही रमेश ...........sanaramesh@gmail.com

आई

आई आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छ्त्री आई तू थंडीतली शाल आता यावीत दु:खे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.