Posts

Showing posts from July, 2008

बा॓लताना जरा सांभाळून...

बा॓लताना जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓, फरक फक्त एवढाच की, तलवारीन॓ मान तर, शब्दांनी मन कापल॓ जात॓ जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू... य॓त असल॓ तरी, दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓. म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓ शब्दच माणसाला जोङतात आणि शब्दच माणसाला तोङतात ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण तर कधी महाभारत रचतात तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓ तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓ तर, तुझ्या एका शब्दावर माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓. म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...

आज वेळ नाही....

आज वेळ नाही.... अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच पदरात पण ते अनुभवयला आज वेळ नाही..... आईच्या अन्गाईची जाणिव आहे पण आईला आज 'आई' म्हणायलाच वेळ नाही..... सगळी नाती संपवुन झालीत पण आज त्या नात्यान्ना पुरायलाही आज वेळ नाही..... सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही..... ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात त्यान्च्याकडे क्षणभर बघायलाही आज वेळ नाही.... सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल जेव्हा ईथे स्वतःकडेच बघायला वेळ नाही...... डोळ्यावर आलीये खुप झोप पण आज कोणाकडे झोपयलाही वेळ नाही..... ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय पण त्या आठवुन रडायलाही वेळ नाही.... परक्यान्ची जाणिव कशी असेल जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही... आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा माग वळुन पहायलाही वेळ नाही........ अरे जीवना तुच सान्ग जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ का नाही?

रडवणं असतं अगदी सोपं

रडवणं असतं अगदी सोपं बघा जरा कुणाला हसऊन टाके घालायला वेळ लागतो सहज टाकता येतं उसऊन निर्धार पाळायला निश्चय हवा कारण नाही लागत मोडायला क्षणार्धातच रेघ मारता येते वेळ लागतो ती नीट खोडायला नाकारणं एक पळवाट असते सामोरं जाउनच होतो स्विकार कर्तव्यासाठी लागतोच त्याग हक्क करतात नुसती तक्रार एकदा पाडुन फोडलेले कप कधिच सांधता येत नाहीत एकदा दुरावलेली मने मग पहील्यासारखी होत नाहीत हार मानली की सारंच संपलं जिंकण्यासाठी लढायलाच हवं मरण तर काय क्षणाचा खेळ जगण्यासाठी झगडायलाच हवं

दिवस अखेरचा...

आज अखेर तो दिवस आला भेटणार शेवटचे प्रत्येकाला... ओठावर होते प्रत्येकाच्याच हसु... डोळ्यात मात्र भरलेले काठोकाठ अश्रु... कुणी झालेल्या चुकांची माफ़ी मागत होता.. तर कुणी केलेल्या मजा-मस्तीची उजळणी करत होता... आठवत होता प्रत्येकजण क्षण आणि क्षण... ते कॅन्टीन मधे बसणं, लेकचर बंक करणं, सिनेमाला जाणं नाहितर कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावर बसून टाईमपास मरणं... किती पटकन सारं काही बदललं.. ३-४ वर्ष निघुन गेली हे आजच कळलं... व्हॅलेंटाईन डे अन फ़्रेन्डशिप डे येतील अजुनही पण मजा नसेल आज नंतर त्याला तशी.... कितितरी आज इथे ह्या जागी सोडून जावं लागणार... रोज सोबत राहणारे मित्र-मैत्रिणी आता कधीतरीच भेटणार.... प्रत्येक जण आजचा हा दिवस जगून घेत होता कारण आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता....