का? अचानक...........
का? अचानक........... असे हे दिवस बदलतात, क्षणात होत्याचे नव्हते करतात, दुखाना अचानक सुखात बदलतात, सुखाना अचानक दुखात बदलतात, का? अचानक............ मला थोड़े यश मिळताच, माझ्या यशावर जलू लागतात, माझ्या प्रगतिच्या वाटेवर, का असे काटे पसरवितात, का? अचानक............ जर माझी जबाबदारी वाढतेय, तर यांचे काय कमी होतेय, जरी मला वरुन मान मिळतोय, तरी यांना मी तरी कुठे कमी देतोय, का? अचानक............ कालपर्यंत माझ्या मदतीला येणारे, आज हाकेला दुर्लक्ष करतात, काय माझा दोष आहे, ज्याची मला शिक्षा देतात, का? अचानक............ अशी मानसे बदलतात, माझ्या चंगुलपनाचा फायदा घेतात, मी चांगले बोलतोय, मग ते का वाकडयात शिरतात, का? अचानक............ कालपर्यंत वरुन चांगले भासनारे, आज का मागुन सुरे खुपसतात, मी तोंडावरच चांगले वाईट बोलतो मग ते का मागुन वार करतात का? अचानक........ .. ...का? अचानक............