ओळखलात का सर मला पावसात आला कोणी.. कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पुन्हा.. गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली.. मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली भिंत खचली , चूल भिजली, होते नव्हते नेले.. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे.. चिखल गाल काढतो आहे ,पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातच, हसत हसत उठला.. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला मोडुं पडला संसार तरी मोडला नाही कणा.. पाठीवरती हात ठेऊन नुसते ‘लढ’ म्हणा - कुसुमाग्रज
Posts
- Get link
- X
- Other Apps
असे जगावे दुनियेमधे, अव्हानांचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . नको गुलामी नक्षत्रांचि, भिती आंधळी तऱ्यांची, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . पाय असावे जमीनिवारती, कवेत अंबर घेताना, हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना . . . संकटासही ठनकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . करुन जावे असेही काही, दुनियेतुनि या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटाचा देताना . . . स्वर कठोर त्या कळाचाहि, क्षणभर व्हावा कातर - कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . - विंदा करंदीकर
हवं ते मिळालं की ..
- Get link
- X
- Other Apps
हवं ते मिळालं की , बाळ खुश होऊन जातं . . बाळ गोड गोड हसून आपल्याला ही खुलवतं .... हवं ते मिळालं तरी , आपण नाखुशच असतो ... पळत्याच्या पाठीमागे सारखे धावत असतो.... आनंदाचा क्षण काही टिकवून ठेवता येत नाही . . दैवाला दूषण देवून हव्यास सोडता येत नाही .... हृदयात डोकावून पाहिले तर कारुण्य खूप दिसते... पण तेवढीच जागा ही आनंदाने व्यापलेली असते.... जावू नये दु:खाने पोळून की सुखाने खूप हूरळून ... शांत शांत वाटेल बघा , दोघांचा समतोल ठेवून ....
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...
- Get link
- X
- Other Apps
माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो , त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया , लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... तुला जर कधी एकटेपना भासेल तर , फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील , आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन , पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ... आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...
श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......
- Get link
- X
- Other Apps
श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली ....... खुप दिवसानंतर आज मला ती पुन्हा दिसली जेव्हा श्रावणाची पहीली सर आज पुन्हा माझ्या दारी बरसली फ़ेर धरुन ती आज पुन्हा माझ्या अंगणी नाचली तिन्ही विश्वाची दौलत जणु तेव्हा मला त्या तीन क्षणातच मिळाली काय सांगु मित्र ां नो ............ .. ही ना नेहमी अशीच येते वाट पाहणा - या कोरड्या पापण्यांवर मग ती गार ओलवा रचते ओला स्पर्श मी करताच गुलाबी गाली मोहक लाजते श्रावणाची ही सर जेव्हा माझ्या दारी बरसते आज ती पुन्हा तशीच आली तिच्या गरम श्वासांच थबकणं , तिच्या कोमल ओठांच थरथरणं आज मी भिजल्या नजरेनं पाहील तिच्या प्रेमाच्या प्रीतील आज मी , ह्रुदयात जपुन ठेवलं वाटलं जणु तेव्हा मनाची हरऎक इछचा पुर्ण झाली श्रावणाची ही पहीली सर जेव्हा आज पुन्हा दारी आली .......
खुप दिवसानंतर
- Get link
- X
- Other Apps
खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला, तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला, मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला, तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला! तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली, जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली, वाटलं असंच तु बोलत राहावस, माझ्या कानात गोड हसत राहावस! तुलाही कदाचित वाटलं असेल, पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल, मनात नसताना फोन ठेवला असेल, अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल! वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची, आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची, का देऊ मी याला उपमा इतर कशाची, माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची! इच्छा झाली होती काहितरी विचारायची, तुलाही आवड होती काहितरी ऐकायची, पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची, मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
- Get link
- X
- Other Apps
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून... एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात... एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही, समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही.. जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत, जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही.. मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत.. तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो.. तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो.. कारण त्याला माहित असत.. फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो... त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत .. मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते... विस...