असे जगावे दुनियेमधे, अव्हानांचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . .

नको गुलामी नक्षत्रांचि, भिती आंधळी तऱ्यांची,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . .

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . .

पाय असावे जमीनिवारती, कवेत अंबर घेताना,
हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना . . .

संकटासही  ठनकावुन सांगावे, आता  ये  बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . .

करुन जावे असेही काही, दुनियेतुनि या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटाचा देताना . . .

स्वर कठोर त्या कळाचाहि, क्षणभर व्हावा कातर - कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . .

                                         - विंदा करंदीकर

Comments

Unknown said…
Explanation required

Hitesh Gomase said…
कवी गुरु ठाकूर आहेत हो
Unknown said…
हि कविता गुरु ठाकुर यांची आहे.

Shrikant said…
ही गुरू ठाकूर यांची कविता आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....