........तुझ्या दोन शब्दांनी...
पाहिले प्रथम तुला , पापणी बंद होईना... हरवून गेलो कुठे , मी मलाच गवसेना... कल्पनेच्या कुंचल्याने साकारलेली तुझी छबि... परि तव लोचनी मी , पाहिली माझीच छबि... काहीसं पुटपुटलीस , सांगू ना शके शब्दांनी... मनात तार छेडली , तुझ्या दोन शब्दांनी... गोपाळकृष्णाची बासुरी , बोटें राधेची तयावरी.... स्वरांनी धुंदी चढली , कंपने त्यांची हृदयावरी... तुझी मधुर गोड वाणी निर्झरासम मोकळे मन... खळखळतांना अनुभवले. तव ते निष्पाप मन....