........तुझ्या दोन शब्दांनी...

पाहिले प्रथम तुला,
पापणी बंद होईना...
हरवून गेलो कुठे ,
मी मलाच गवसेना...
कल्पनेच्या कुंचल्याने
साकारलेली तुझी छबि...
परि तव लोचनी मी,
पाहिली माझीच छबि...
काहीसं पुटपुटलीस,
सांगू ना शके शब्दांनी...
मनात तार छेडली,
तुझ्या दोन शब्दांनी...
गोपाळकृष्णाची बासुरी,
बोटें राधेची तयावरी....
स्वरांनी धुंदी चढली ,
कंपने त्यांची हृदयावरी...
तुझी मधुर गोड वाणी
निर्झरासम मोकळे मन...
खळखळतांना अनुभवले.
तव ते निष्पाप मन....
Comments
mala khup awdali . . .
keep it up . . !