माणुस का चुकतो देवा
माणुस का चुकतो देवा
का असा करतो वेडयासरखा ,
ईश्वराचा अंश त्यात असूनही
का वागतो राक्षसासारखा.........
माणुस का चुकतो देवा
का करतो एवढी दुसरयाची निंदा..
दुसरयांतील दोष शोधण्यात
स्वतःला हरवून बसतो कितींदा..........
माणुस का चुकतो देवा
का तो माणसातल्या माणूसकीला ही विसरत चाललाय...
धर्म,जात,पंथ यांच्या नावाखाली
माणुसकीलाच काळिमा फासत चाललाय
माणुस का चुकतो देवा
का आज माणसाला माणुसच नकोसा झालाय
तुच बनवलेल्या ८४ लाख योनीतील प्रत्येक जीव मात्र
माणसाचा जन्म घ्यायला आतुर झालाय
माणुस का चुकतो देवा
का असा चुका करतो जाणुनबुजुन....
चुकीचं करतोय माहित असुनही चुकीच्या
गाळलेल्या जागा भरत राहतो बरोबर म्हणुन...
माणुस का चुकतो देवा
का धरतीवरील प्रत्येकाला चांगलच नाही बनवलसं.
कि तू ही माझ्यासारखा तुळ राशीचा म्हणुन
तराजुने चांगल्यालाही वाईटाने मोजुन मापुनच पाठवलेस...
माणुस का चुकतो देवा
का पण माणसाला तु बनवलस..
तुला ब्रम्हांडात रहावेना एकटे म्हणुन
करमणुकीचं साधन तर नाही ना घडवलंस...............????????????

Comments
hya site var
kharch khup chan aahe kavita
me imagine karat hoto,
aani sare chitra samor ubhe hote