अशी असावी ती

अशी असावी ती
नाही भेटलो मी दिवसभर तर
तीने खुप बैचेन व्हावं
संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून
मला अगदि सरप्राईज द्याव

भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं

फ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं

माझं काही चुकलं तर
तीन कधीही रागवावं
अबोला धरुन मला रडवता
काय चुकलं ते समजवावं

जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहाव

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....