Posts

Showing posts from May, 2009

कारण हे वयच असं असतं....

कारण हे वयच असं असतं.... पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते.. रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते.... कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात... पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात... सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं..... कुठून येतं फुलपाखरू?? कुठे निघुन जातं ?? चिमटीत उरतो रंग तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं.... भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....कारण हे वयच असं असतं.... सप्तरंगी स्वप्नांचे दिवस.. वाऱ्यासारखे निघून जातात.. जगाने दिलेल्या जखमांवर.. हळूवार फुंकर घालतात.. जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..? कारण हे वयच असं असतं..

येथेच उभा आहे मी

येथेच उभा आहे मी तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी तू भेटणार या आशेवरच जगत आहे मी काय सांगू तुझ्याशिवाय कसा मी जगतोय रोज तुज्या भेटीच्या आशेवरच जगाशी लढतोय तू आज येशील उदया येशील येवून हे जीवन प्रेमाने बदलून टाकशील तू दाखविलेल्या स्वप्नात रमून आहे मी तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी सार्यानीच सांगितलय तुझी आश्या सोडून दे नाहीच येणार तू स्वप्न पहान सोडून दे पण माहित आहे मला शपथा तू तोडणार नाहीस उशिरा का होईना आल्यावाचून राहणार नाहीस तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो, मला कधी कळलच नाही की नेमक मला दुख कशाच आहे? ती मला सोडुन गेली याच्..की ती मला सोडुन गेली म्हनुन मला दुख झाल हे जगाला कळल नाही याच…. मेलेल्या बापालाही काही काळानंतर, माणुस विसरतोच ना…. मग पहिल प्रेम विसरण कठिण का?? कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत सतत वाटत असत की सर्वाना कळाव, मी किती सहन केलय मी चांगला आहे.. प्रश्न ही माझाच असतो आणि उत्तर ही माझेच…… फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतो जो मला हव ते उत्तर सांगेल………… जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो, तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत. किंबहुना ………………….. त्यालाही तसच वाटत असेल.. वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात, फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….