कारण हे वयच असं असतं....

कारण हे वयच असं असतं....
पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते..
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते....
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात...
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात...
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं.....

कुठून येतं फुलपाखरू??
कुठे निघुन जातं ??
चिमटीत उरतो रंग
तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं....
भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....कारण हे वयच असं असतं....

सप्तरंगी स्वप्नांचे दिवस..
वाऱ्यासारखे निघून जातात..
जगाने दिलेल्या जखमांवर..
हळूवार फुंकर घालतात..
जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..?
कारण हे वयच असं असतं..

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....