Posts

Showing posts from September, 2010

हवं ते मिळालं की ..

हवं ते मिळालं की , बाळ खुश होऊन जातं . . बाळ गोड गोड हसून आपल्याला ही खुलवतं .... हवं ते मिळालं तरी , आपण नाखुशच असतो ... पळत्याच्या पाठीमागे सारखे धावत असतो.... आनंदाचा क्षण काही टिकवून ठेवता येत नाही . . दैवाला दूषण देवून हव्यास सोडता येत नाही .... हृदयात डोकावून पाहिले तर कारुण्य खूप दिसते... पण तेवढीच जागा ही आनंदाने व्यापलेली असते.... जावू नये दु:खाने पोळून की सुखाने खूप हूरळून ... शांत शांत वाटेल बघा , दोघांचा समतोल ठेवून ....

प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो , त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया , लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... तुला जर कधी एकटेपना भासेल तर , फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील , आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ... पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ... तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन , पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ... आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ , प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...

श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......

श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली ....... खुप दिवसानंतर आज मला ती पुन्हा दिसली जेव्हा श्रावणाची पहीली सर आज पुन्हा माझ्या दारी बरसली फ़ेर धरुन ती आज पुन्हा माझ्या अंगणी नाचली तिन्ही विश्वाची दौलत जणु तेव्हा मला त्या तीन क्षणातच मिळाली काय सांगु मित्र ां नो ............ .. ही ना नेहमी अशीच येते वाट पाहणा - या कोरड्या पापण्यांवर मग ती गार ओलवा रचते ओला स्पर्श मी करताच गुलाबी गाली मोहक लाजते श्रावणाची ही सर जेव्हा माझ्या दारी बरसते आज ती पुन्हा तशीच आली तिच्या गरम श्वासांच थबकणं , तिच्या कोमल ओठांच थरथरणं आज मी भिजल्या नजरेनं पाहील तिच्या प्रेमाच्या प्रीतील आज मी , ह्रुदयात जपुन ठेवलं वाटलं जणु तेव्हा मनाची हरऎक इछचा पुर्ण झाली श्रावणाची ही पहीली सर जेव्हा आज पुन्हा दारी आली .......

खुप दिवसानंतर

खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला, तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला, मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला, तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला! तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली, जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली, वाटलं असंच तु बोलत राहावस, माझ्या कानात गोड हसत राहावस! तुलाही कदाचित वाटलं असेल, पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल, मनात नसताना फोन ठेवला असेल, अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल! वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची, आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची, का देऊ मी याला उपमा इतर कशाची, माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची! इच्छा झाली होती काहितरी विचारायची, तुलाही आवड होती काहितरी ऐकायची, पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची, मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून... एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात... एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही, समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही.. जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत, जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही.. मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत.. तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो.. तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो.. कारण त्याला माहित असत.. फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो... त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत .. मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते... विस...

मृत्यूसारखी सुंदर गोष्ट!

वेडा म्हणाल मला पण मी वेडा मुळीच नाहि खरे सांगतो मित्रांणो मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही जिवन हे पुरतेच छळते याची जाणीव मात्र सरणावर जळताना होते भाई-बंधू सगे सगे-सोयरे असतात नुसते नावापुरते यमासारखा खरा मित्र जिवनात शोधूनहि सापडत नाही मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही पाप-पुण्याची गणना येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात केलेली पापे धुण्यासाठी मग श्री क्षेत्रे फ़िरतात पृथ्वीवर जेवढे पाप तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाही आणी या नरकातुन सोडवणारा मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाही मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही गरिब श्रिमंत, कोण मोठा कोण छोटा याच्या दरबारि मात्र सर्वांना सारखीच जागा नश्वर या जगात अमर असा कुणीच नाही साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला मृत्यूशिवाय पर्याय नाही म्हणुन म्हणतो मित्रांणो याला घाबरण्यासारख काहिच नाही मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही !

उद्या जगेन

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास सागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर ? आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस ? आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस ? एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो आणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो. आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी ? सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल ? हातातल्या का...

अन मौनातच अर्थ सारे

नजरा नजर होताच आमुची चाफेकळी सम ती फुलली होती ओठांवरती स्मित हास्य पसरले लाजून नजर अन तिने चोरली होती …. केतकी चेहरा तिचा गुलाबापरी रंगला होता गजरयातल्या जाईचा सुगंध माझ्यापर्यंत पोचला होता …… नजर झुकलेली अन चालीचा वेग मंदावला होता मोगरा लावण्याचा नखशिखांत बहरला होता ….. इच्छा असली मनात जरी नजर तिने उचलली नव्हती कसलीही रीत लाजण्याची , कुणाची तरी का भीती होती ?….. हिरावू नकोस प्रिये तू , भाग्यातला हा क्षण एकदाचा तुझ्या डोळ्यात पाहू दे ग मला , तरल भाव तो प्रेमाचा …… हलकीच उमलली पापणी हिमतीने शेवटी बांध तुटले संयमाचे शब्दात कसे तरी सांगू मित्रहो , अबोल भाव ते प्रीतीचे …… नजरेचा कट्यार तिच्या काळजात हळुवार घुसला होता गुलाबाचा काटा मनात कुठेतरी खोलवर रुतला होता …….. स्तब्द्ध होते विश्व भोवतीचे धुंद होते भाव सारे नजरेचीच फक्त भाषा अन मौनातच अर्थ सारे ……

प्रेम आणी computer वेड

वर्गात नेहमी खुन्नस देता देता दिलीस एकदा सुन्दर smile उघडशील का माझ्या "pritee" ची एक एक Backup File. जेव्हा तुला पहातो तेव्हा hang होते माझी hard Disk माझी OS ही सांगते मला घेतली आहेस मोठी Risk. Risk Management क़ेलेय मी Estimate ही काढला आहे . थोडे Reengineering करावे लागेल तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे . फक्त एकदाच पहायचे आहे तुझ्या ह्रुदयात Login करुन Delete करायचेत सगळे Folder फक्त माझ्या नावाचा Folder राखुन . Antivirus बनेन तुझ्यासाठी वाचवेन तुला Spam पासुन एकच mail कर माझ्या mail वर वाट बघतोय कधीपासुन . म्हणणे फक्त एवढेच आहे आशा करतो तुझी इच्छा ही असावी कोणी visit द्यायचे म्हटले तर तुझी माझी URL एकच असावी .......

कर्म आणि नशीब

कर्म आणि नशीब हे आयुष्याच्या दोन बाजू कर्म हे नाशिबासोबत चालत , नशीब हे आपल्या तळहाताच्या रेषेवर असतं , कर्म हे दानाधार्मावर असतं , जेव्हा कोणी गोरगरिबाला दान करतं , तेव्हाचं त्याचं नशीब त्याच्या सोबत चालत , नशीब हे पाप - पुण्यावर चालत , नशीब आणि कर्म हे लिखित असतं , ब्रम्हांडात जे जे लिहिले असते , ते ते आपल्या जीवनावर घटतं असतं , नशिबामध्ये जे जे पाप करतो ते ते आपण पुण्य म्हणजे कर्म करतो , म्हणूनच एका महापुरुषाने सागितले आहे , कर्म कर कर्माची अपेशा करून नको , कर्म हे आयुष्यात करत राहणे , फळाची अपेशा न करता कर्म करत राहा तेव्हा कधी तरी ब्रम्हांडात आपलं नशीब बदलेले तेव्हाचं आपल्याला योग्य फळ मिले म्हणूनच नशीब हे पाप - पुण्य वर असतं , आणि कर्म हे नशीब बरोबर असतं ,

जमलंच तर परत ये

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये! साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये! कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख; किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये! महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे; पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये! मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य; तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये! थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू; कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये! तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले; या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत.........

डोळ्यातील अश्रू पडतात

तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि याचा अर्थ असा नाहि की तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि शब्दांनाहि कोड पडावं अशीही काही माणस असतात किती आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात कुणीच आपल नसतं मग आपण कुणासाठी असतो आपलं हे क्षणिक समाधान इथ प्रत्येक जण एकटा असतो डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब उगाचच का अडकून बसतात काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून किती निष्ठूरपणे सोडून जातात नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे मिळणार पण प्रेमात पडल्याशिवाय ते तुम्हाला कस कळणार जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी देण्यात महत्व असत कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं शब्दांनी कधितरी मझी चौकशी केली होती मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती स्वप्नातील पावलांना चालणे कधी कळलेच नाहि पाऊलवाट चांगली असली तरी पाऊल हे वळलेच नाही अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही, सगळ कळतय मला पण तुला सोडून दुरही जाववत नाही कधी कधी जवळ कुणीच नसावसं वाटतं आपलं आपण अगदी एकट असावसं वाटत....

मला हरवून टाकलेस तू.....( Lost In Love )

मला हरवून टाकलेस तू.....( Lost In Love ) काय सखे तु जादू केलीस , मी माझ्यातच हरवून गेलो.. तुझ्या आसीम प्रेमाखातर.. माझं मलाच विसरून गेलो... तुझे ते बंदिशातले केस आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले.. जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर, पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले.. माझे ते छुपे इशारे अन तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे.. माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले.. नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले... काय म्हणावा तुझा तो नखरा जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा... मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो.. आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो.. तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या.. मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या.. तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही असाही असतो पाऊस लहरीचा अन गोड गुलाबी मंद शिरशिरीचा.. कधी भांडलो तुझ्याशी उगाच, अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच.. मग तुझी माफी मागताना साजने, केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच बघ कसा हरवलो सख...

प्रेम .......

विवाह रुपाने बांधली जाईल तुझी नि माझी जीवनगाठ कारण आहे आपल्या दोघांची एकच पाऊलवाट --------------------------------- काहीजण किती कठोर नियम पाळतात प्रेम करणाऱ्यांना नेहमी बदनामीच्या आगीत जाळतात --------------------------------- काहीजण कळूनसुद्धा नकळल्यासारखे वागतात प्रेम करणाऱ्यांवरती ते सदैव बंधने लादतात --------------------------------- प्रेम करण्यासाठी हवी तयारी संकटांना तोंड देण्याची प्रेमाने मागून मिळत नसेल तर जबरदस्तीने ओढून घेण्याची ---------------------------------- लोकांच अजब आहे प्रेमाला ते नाव ठेवतात लग्न जुळवताना मग ते गाव का शोधतात? --------------------------------- माझ्या हृदयात फक्त तुझ्यासाठीच जागा आहे आपल्याला नात्यात बांधणारा प्रेमाचा एकच धागा आहे --------------------------------- प्रेमाला कोणतीही उपमा अतिशयोक्तीच ठरेल तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच मात्र प्रेमाचा घडा भरेल --------------------------------- प्रेम या अडिच अक्षरात ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं नाजुक बंधन असतं जपलेलं --------------------------------- प्रेमाची व्याख्या करायला सर्...