मृत्यूसारखी सुंदर गोष्ट!

वेडा म्हणाल मला
पण मी वेडा मुळीच नाहि
खरे सांगतो मित्रांणो
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

जिवन हे पुरतेच छळते
याची जाणीव मात्र
सरणावर जळताना होते
भाई-बंधू सगे सगे-सोयरे
असतात नुसते नावापुरते
यमासारखा खरा मित्र
जिवनात शोधूनहि सापडत नाही
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

पाप-पुण्याची गणना
येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात
केलेली पापे धुण्यासाठी
मग श्री क्षेत्रे फ़िरतात
पृथ्वीवर जेवढे पाप
तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाही
आणी या नरकातुन सोडवणारा
मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाही
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही

गरिब श्रिमंत, कोण मोठा कोण छोटा
याच्या दरबारि मात्र
सर्वांना सारखीच जागा
नश्वर या जगात
अमर असा कुणीच नाही

साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला
मृत्यूशिवाय पर्याय नाही
म्हणुन म्हणतो मित्रांणो
याला घाबरण्यासारख काहिच नाही
मृत्यूसारखी सुंदर गोष्ट
या जागात दुसरी कुठलीच नाही !

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....