Posts

Showing posts from February, 2008

आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!!

आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!! माम्या-मावश्या छेड-खानी करतात माझी आई-आई तू चांगलं त्यांना रागवून दे म्हणा पोर अजुन लहान माझं लगिन लावत नाही, सुपडं वाजवून दे... तुला मैत्रीणी पूसतील माझ्या मुलीशी तुझ्या मुलाचं लगिन लावुन दे मुलगा माझा गोंडस त्याच्या समोर मुलगी तुझी नकटी सरळ सांगुन दे... माम्या-मावश्यांनी नाही एकलं तरी सुध्दा तर शोधायला मुली त्यांना सांगुन दे आणतिल शोधून तेंव्हा मात्र काळी-ठेंगणी अस कारण सांगुन नापसंत करुन दे.. तुझ्या आवडीची दादासाठी शोधुन आणली वहिनी सारखीचं मुलगी मलाही शोधुन दे आई-आई वहिनीच्या लहान बहिणीशीचं आता माझं लगिन लावुन दे...

मृगजळ

तिनं नाही म्हटलं आणि त्यानं मन आवरलं अनावर भावनांना कसबसं सवरलं हळुवार स्वप्न आणि मनाचे कित्तेक खेळ सुखाचे झालेले भास आणि हळवी कातरवेळ आता फक्त आठवत रहात तिचं फक्त स्वप्नातच त्याच असणं आणि हेच होतं कदाचित त्याचं मृगजळला फसणं

घोडं

हे असं कसं घडलं तुझ्यावर प्रेम कसं जडलं सरळ मार्गी जाता जाता गाडं कसं गडगडलं मी माझा म्हणता म्हणता तुझाच म्हणणं कसं काय घडलं खोटी ऐट दाखवता दाखवता अचानक प्रेमांत कोण पडलं आता प्रेम केलंच आहे तर घोडं कुठे अडलं नाही नाही म्हणता म्हणता शेवटी केलन् ना लग्न करून करून कोण किती करील उपस्थित विघ्न

आयुष्य असचं जगायचं असतं............

जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं आयुष्य असचं जगायचं असतं दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असचं जगायचं असतं मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं............

मैत्री

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

डोळ्यातील अश्रू पडतात

तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि याचा अर्थ असा नाहि की तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि शब्दांनाहि कोड पडावं अशीही काही माणस असतात किती आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात कुणीच आपल नसतं मग आपण कुणासाठी असतो आपलं हे क्षणिक समाधान इथ प्रत्येक जण एकटा असतो डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब उगाचच का अडकून बसतात काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून किती निष्ठूरपणे सोडून जातात नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे मिळणार पण प्रेमात पडल्याशिवाय ते तुम्हाला कस कळणार जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी देण्यात महत्व असत कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं शब्दांनी कधितरी मझी चौकशी केली होती मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती स्वप्नातील पावलांना चालणे कधी कळलेच नाहि पाऊलवाट चांगली असली तरी पाऊल हे वळलेच नाही अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही, सगळ कळतय मला पण तुला सोडून दुरही जाववत नाही कधी कधी जवळ कुणीच नसावसं वाटतं आपलं आपण अगदी एकट असावसं वाटत....

भोगले जे......

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले लोक भेटायास आले, काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

नशीबवान तर ..........

नशीबवान तर सगळेच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो हसतमुख तर सगळेच असतात दुसर्याला हसवणारा एखादाच असतो मर्त्य तर सगळेच असतात कर्तुत्ववान अमर एखादाच असतो चमकणारे कजवे बरेच असतात प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो सुखचे सोबती सर्वच असतात दुःखचा साथीदार एखादाच असतो अनुभवाने शहाणे बरेच असतात अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो जाळणारे बरेच असतात मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो झेपेल तेव्ह्ढच दुख: तो आपल्याला देतो, दिलेलं दुख: संपलं, की आपल्यालाच नेतो!!! दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही.

नाती

नाती नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!! काही अगदी जवळची, तर काही अशीच वरवरची... नाती काही क्षणातच जुळणारी, तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी... काही नात्यांना देता येत नाही नाव, तरीही ती असतात खूपच खास ! काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी, दूर राहूनही कधीच न तुटणारी... मात्र काही नाती तुटल्यानंतरही, जन्मभर आठवत राहणारी ........

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे.. पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे... माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं... मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं... पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं.. मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं अशावेळी.... आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

सारं काही नकली आहे...

शिकण्यात काही मजा नाही , इंजिनिअरींग सारखी सजा नाही , अभ्यासाला तर रजा नाही , जागा आमची चुकली आहे , अहो , सारं काही नकली आहे. आम्हाला तर आहेत दोनच हात , तरी सबमिशन करतो रातोरात , शिव्या खाऊन काढतो दात , लाज अब्रु विकली आहे , अहो , सारं काही नकली आहे. ओरल पुरता नमस्कार , बाहेर येताच शिव्याचार , हा तर म्हणे शिष्टाचार कर्तबगारी खचली आहे , अहो , सारं काही नकली आहे. करुनी एवढी दरी पार , आमची म्हणे बोथटच धार , नोकरीस फिरतो दारोदार , आशा आता थकली आहे , अहो , सारं काही नकली आहे।

सहज बोलताना

सहज बोलताना तुझी बात आली जुन्या सावल्यांची जुनी रात आली हसलो जरी मी अश्रू फसवून गेले तुझ्या आठवांची बरसात झाली... म्हटले कुणी , " ती मौजेत आहे" , चला एकदाची खबरबात आली... खरे सांग माझे कसे पाप झाले का माझ्या स्मृतींना अशी मौत आली ? लक्ष्मीचीच होती तुझी पाऊले जी कुणा पुण्यवंताच्या दारात गेली...

अबोल प्रेम

वेदश्री हे फक्त माझ्याचसोबत नेहमी असंच घडणार आहे? तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट 'ते' न बोलताच संपणार आहे? भेट-वेळ रोजची ठरलेलीच तरी अजून काय ठरणार आहे? बोलायचं पटकन पण वेडं मन त्याचाही मुहुर्त पाहणार आहे ! भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे पटकन विचारावा प्रश्न हवासा तर शब्द ओठीच अडणार आहे ! मी न विचारताच तू काय हवं ते उत्तर देणार आहे? हे पुरतं कळतंय तरीही तोंड माझं का बोलणार आहे? न बोलता बोललेले शब्द तुला वेड्याला कळणार आहे? मी बोलले/न बोलले तरी गप्पच नेहमीसारखा तू राहणार आहे ! भावभावना समजून घेणं सगळंसगळं थांबणार आहे उष्ट्या कुल्फीची चव मात्र जिभेवरती रेंगाळणार आहे स्वप्न माझं हे संपलं तरीही मनात तूच उरणार आहे तुझ्यात मी नसले तरी माझ्यात तूच सापडणार आहे !

उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं, सारंच श्रेय हुकतात माणसं... प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं, सावकाश हे शिकतात माणसं... गंधासाठी दररोज कोवळ्या, कितीक फुलांस विकतात माणसं शतकानुशतके कुठलीशी आस, जपून मनात थकतात माणसं... जुनाट जखमा भरू लागल्या की, नवीन सिगार फुकतात माणसं... हरेक पाकळी गळुनिया जाते अन अखेरीस सुकतात माणसं... नको रे असं कडू बोलू 'शता'.. उगाचच किती दुखतात माणसं !!!

आई खूप एकट वाटत आहे ग!!

आई खूप एकट वाटत आहे ग!! समुद्रात बुडाल्यासारख... जंगलात हरवल्यासारख... वदलात सापदल्यासारख... आई खूप घाबरयाला होत आहे ग!!! अंधारात कोंडल्यासारख... भूताने पछाड़ल्यासारख... धरती कंपल्यासारख... नवजीवन शोधण्याच्या वेडात.. तुला सोडून आलो.., काय मिळवल माहित नाही.. पण स्वताहाला मात्र गमावून बसलो.., आई परत येतील का ग ते क्षण ... परत फिरवशील का ग हात माझ्या डोकया वरून.. परत घेशील का ग मला तुझ्या कुषित.. परत शोधून देशील का मला .... माझाच मी... गोंधळलेला

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या.....

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस जख्मं ती पुर्ण बुजली आता हरवून गेली त्यावरची खपली तो धपाटा, ती फुंकर, ती माया ती हरेक आठवण मनात जपली आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

आई, तू होतीस म्हणून...

आई, तू होतीस म्हणून... शब्द मिळाले निरर्थक बडबडीला संस्काराचे आकार आले आई, तू होतीस म्हणून... धैर्य आले ओल्या सुक्या जखमा पुसत परत खेळायचे तंत्र जमले आई, तू होतीस म्हणून... रडले नाही दांडगाईच्या खोडिला युक्तिचा जोडा मारुन हसत हसत घरी आले आई, तू होतीस म्हणून... गणित जमले जो आपला त्याला हातचा राखत उरलेल्यांना वजा केले आई, तू होतीस म्हणून... मी झाले मुळांशी नातं जपताना फांद्यांना नवे आकार दिले

बाबा (एक आर्त हाक)

बाबा (एक आर्त हाक) (हि कविता माझ्या स्व.बाबांसाठी. माझी हाक त्यांनी ऐकावी हीच ईच्छा.) लोक म्हनतात, "मूलगा- अगदी बापावर गेलाय, बिचारा पोरं तो, बपाविना वाढलाय." खरच का हो बाबा, मी तूमच्या सारखा दिसतो? तुमच्या विना खरच मी, बिचारा का हो वाटतो? तूमच्याकडून शिकन्यासारखं- बरंच काहीं होतं, ते समजन्याईतकं आमचं- वयं मात्र नव्हतं. आईच्या नजरेत- तूमचीच मूर्ती दिसते, तूम्हाला येवुन बिलगावं, ईच्छा सतत होते. कित्तेक लोकं तूमची- अजुनही आठवन करतात, तुम्ही केलेल्या उपकारांची जान ते ठेवतात. बाबा तुम्ही गेल्यावर ईथे सगळच बदललंय आपल्याच लोकांनी दार बंद केलय. ज्य मनसांना, तुम्ही- सूखी जग दिलं तूमच्या लेकरांना त्यांनी- वार्यावर सोडलय. बाबा तूमचा हा पोरं तूमच्या सारखाच होईल, पून्हा एकदा शून्न्यातून विश्व नीर्माण करील. बाबा तूमचा आर्दश डोळ्यांपूढे ठेवलाय तूमच्या पावूल खूनांवर- मी पाय ठेवलाय. बाबा मला तूमच्याशी खूप-खूप बोलायचंय एकादातरी तूम्हाला, डोळे भरून पहायंचय. एकदातरी बाबा माझ्या स्वप्नात या, एकदातरी बाबा मला मीठीत घ्या.