मृगजळ


तिनं नाही म्हटलं
आणि त्यानं मन आवरलं
अनावर भावनांना
कसबसं सवरलं
हळुवार स्वप्न
आणि मनाचे कित्तेक खेळ
सुखाचे झालेले भास आणि
हळवी कातरवेळ
आता फक्त आठवत रहात
तिचं फक्त स्वप्नातच त्याच असणं
आणि हेच होतं कदाचित त्याचं
मृगजळला फसणं

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....