बाबा (एक आर्त हाक)

बाबा (एक आर्त हाक)

(हि कविता माझ्या स्व.बाबांसाठी. माझी हाक त्यांनी ऐकावी हीच ईच्छा.)

लोक म्हनतात, "मूलगा-
अगदी बापावर गेलाय,
बिचारा पोरं तो,
बपाविना वाढलाय."

खरच का हो बाबा,
मी तूमच्या सारखा दिसतो?
तुमच्या विना खरच मी,
बिचारा का हो वाटतो?

तूमच्याकडून शिकन्यासारखं-
बरंच काहीं होतं,
ते समजन्याईतकं आमचं-
वयं मात्र नव्हतं.

आईच्या नजरेत-
तूमचीच मूर्ती दिसते,
तूम्हाला येवुन बिलगावं,
ईच्छा सतत होते.

कित्तेक लोकं तूमची-
अजुनही आठवन करतात,
तुम्ही केलेल्या उपकारांची
जान ते ठेवतात.

बाबा तुम्ही गेल्यावर
ईथे सगळच बदललंय
आपल्याच लोकांनी
दार बंद केलय.

ज्य मनसांना, तुम्ही-
सूखी जग दिलं
तूमच्या लेकरांना त्यांनी-
वार्यावर सोडलय.

बाबा तूमचा हा पोरं
तूमच्या सारखाच होईल,
पून्हा एकदा शून्न्यातून
विश्व नीर्माण करील.

बाबा तूमचा आर्दश
डोळ्यांपूढे ठेवलाय
तूमच्या पावूल खूनांवर-
मी पाय ठेवलाय.

बाबा मला तूमच्याशी
खूप-खूप बोलायचंय
एकादातरी तूम्हाला,
डोळे भरून पहायंचय.

एकदातरी बाबा
माझ्या स्वप्नात या,
एकदातरी बाबा
मला मीठीत घ्या.

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....