आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!!


आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!!
माम्या-मावश्या छेड-खानी करतात माझी
आई-आई तू चांगलं त्यांना रागवून दे
म्हणा पोर अजुन लहान माझं
लगिन लावत नाही, सुपडं वाजवून दे...

तुला मैत्रीणी पूसतील माझ्या मुलीशी
तुझ्या मुलाचं लगिन लावुन दे
मुलगा माझा गोंडस त्याच्या समोर
मुलगी तुझी नकटी सरळ सांगुन दे...

माम्या-मावश्यांनी नाही एकलं तरी सुध्दा
तर शोधायला मुली त्यांना सांगुन दे
आणतिल शोधून तेंव्हा मात्र
काळी-ठेंगणी अस कारण सांगुन नापसंत करुन दे..

तुझ्या आवडीची दादासाठी शोधुन आणली
वहिनी सारखीचं मुलगी मलाही शोधुन दे
आई-आई वहिनीच्या लहान बहिणीशीचं
आता माझं लगिन लावुन दे...

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....