माझी होशील का ? ..

बस एकदा हो म्हणून, मज तू वरशील का
आज माझी , फ़क्त माझीच , सखये होशील का

चंद्र,सूर्य,ताऱ्यांवर नसेल माझं वर्चस्व
बाकी काही माग तू,आणेन विकून सर्वस्व
या गोड व्यवहारात माझं हृदय मागशील का

म्हणतात लोकं ,प्रेम आंधळं असतं
खरं तर ते जग या जगावेगळं असतं
माझ्या डोळ्यातून हे स्वप्नाळू जग पाहशील का

भरल्या घरात मनाची सुनी ओसरी
खुदकन हसवतात तुझी स्वप्नं बावरी
इवल्याशा या आभाळभर जागेत राहशील का

हे रेशमी केस,गालावरची अवखळ खळी
मुग्ध बडबडती जिवणी,वेड लावते मुळी
या रुपचंद्राने माझं आकाश पूर्ण करशील का

काहीही लिहतोय मी , जे सुचतंय ते
शब्द आता रागवलेत , त्यांना बोचतंय ते
शब्दांना माझ्या हसवण्यासाठी येशील का

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....